Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
गणेश विसर्जनाला पीएमपी कडून बसचे नियोजन

पुणे : गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे शहरांमध्ये नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावातून गणपतीची रोषणाई ,सजावट तसेच मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून बसची नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘इस्त्रो’मधील शास्त्रज्ञ तेजस्वी शिंदे ही पिंपरी-चिंचवडकरांचा अभिमान!
गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी शहरातील काही मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. प्रवाशांचे गैरसह होऊ नये म्हणून पीएमपी ने बसेसचे नियोजन केले आहे. शहरातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता या रस्त्यावरून संचालनात असलेल्या मूळ स्थानकावरून सुटणाऱ्या बसेसचे संचलन तात्पुरत्या बस स्थानकावरून करण्यात आले आहे.





