ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

शोमध्ये पक्षपाती वागणूक? प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट

आर्याची बाजू ऐकली जात नसल्याचा आरोप

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची वादग्रस्त वर्तणूक, मराठी संस्कृतीचा अपमान,  शो निर्मात्यांचा फेवरिटिझम

मुंबई : प्रेक्षकांचा आवडता शो सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही स्पर्धकांना उघड फेवर करणं आणि मराठी संस्कृतीचा अपमान करणं, या मुद्द्यांवरून प्रेक्षकांमध्ये असंतोष पसरत आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे स्पर्धक सातत्याने मराठी कलाकारांचा आणि संस्कृतीचा अपमान करत असल्याचे आरोप आहेत. अरबाज पटेलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तसेच, या शोमध्ये फेवरिटिझमचा मुद्दा उभा राहिला आहे. निक्की तांबोळीला वारंवार चुकीची वागणूक दिली जात असूनही तिच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तिच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष केलं जात आहे, ज्यामुळे शोच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रेक्षकांनी असा आरोप केला आहे की, शोमध्ये काही स्पर्धकांना उघडपणे फेवर केलं जात आहे, ज्यामुळे निष्पक्षतेचा अभाव जाणवतो.

अनेक प्रेक्षकांनी या शोचे निर्माते प्रेक्षकांची दिशाभूल करत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या स्पर्धकांना षडयंत्र रचून बाहेर काढलं जात असल्याचं आरोप केले जात आहेत. निक्की आणि अरबाजच्या विरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांवर कारवाई केली जात असल्याचंही प्रेक्षक म्हणत आहेत.

प्रेक्षकांनी आता मागणी केली आहे की, कितीही टीआरपी मिळत असला तरी, या स्पर्धकांवर योग्य कारवाई होऊन शोमध्ये निष्पक्षता आणि न्याय प्रस्थापित केला जावा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button