ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाहीर संभाजी भोरे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावचे कणखर, लोकशाहीर

सांगली : शाहीर संभाजी भोरे म्हणजे लोककलेला मिळालेले माणदेशी रत्नच आहे. 1972 पासून पारंपरिक लोकशाहीरी, लोकनाट्य, बतावणी कला जोपासून ग्रामीण भागात आपल्या गायणपार्टी द्वारे समाजाभिमुख प्रबोधन साधणारे हरहुन्नरी कलाकार, लेझीम पथक पण यशस्वीपणे चालविणारे शाहीर संभाजी भोरे 1980 पासून मुंबई मध्ये येऊन फक्त नोकरी न करता गोवंडी लुम्बिनी बाग येथे कलाकार जमवून, स्नेही ज्ञानेश्वर भोंग साहेब सिनिअर पोलिस इन्स्पेक्टर, अशोक गायकवाड, अरुण साळवे, गौतम अरवेल सर, अजित बनसोडे यांच्या अनमोल सहकार्याने मला तुमची म्हणा हे लोकनाट्य निर्माण करतात. संजय कसबेकर यांना पहिली दिग्दर्शनाची संधी देणारे शाहीर संभाजी भोरे यांनी परिसरात राजू वानखेडे, चंद्रकांत बारशिंगे, विकास गायकवाड अशा अनेक कलाकारांना घडविण्याचे महान कार्य शाहीर संभाजी भोरे यांनी केले आहे. संगीतकार प्रविण जुवेकर, हेमा बेले जुवेकर, महादेव मोरे, रविंद्र वाघमारे, रमेश सावंत, सुवर्णा बारशिंगे, गोरख माने, असे अनेक कलाकार प्रसिद्धीस आले. महाराष्ट्र शासन, दारुबंदी प्रचार खाते, सांस्कृतिक कला संचलनालय, दूरदर्शन, लॉर्ड बुध्दा चॅनेल नागपूर, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात अशा ठिकाणी शाहीर भोरे यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे.

मुंबई दूरदर्शनवर दारुत रंगला त्याचा संसार भंगला हे लोकनाट्य तत्कालीन निर्मिते मदन कानडे यांनी प्रसारित केले होते. मंत्रालय वार्ता 2004 चा कलाभूषण पुरस्कार तत्कालीन मंत्री ना. एकनाथ राव गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित केले होते. 2021 मध्ये अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी शाहीर भोरे यांना राष्ट्रीय स्तरावरील तथागत भगवान बुद्ध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

दैनिक सांगोला, तुफान क्रांती यांच्या 2024 च्या आदर्श सेवा पुरस्काराने नुकतेच शाहीर संभाजी भोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी राजश्री शाहू स्मारक कोल्हापूर येथे तेजस फाऊंडेशन नाशिक या संस्थेच्या 16 व्या वार्षिक वर्धापन दिनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावचे कणखर, अस्सल माणदेशी शाहीर संभाजी भोरे यांना वयाच्या 62 व्या वर्षी राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आजही शाहीर आपला शाहीरी बाणा त्याच तडफदारपणे डफावर थाप देऊन रसिकांना मंत्रमुग्ध करतात. शाहीर संभाजी भोरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कारामुळे आटपाडी पंचक्रोशीतील कलाकार व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाहीर संभाजी भोरे यांच्यावर मिडिया व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाहीर संभाजी भोरे यांना पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button