सतीश काळे यांचा विशेष समाजरत्न पुरस्काराने सन्मान

पिंपरी : पुरोगामी विचाराचा वारसा जपण्याची धडपड आणि सामाजिक योगदान दिल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांना नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विशेष सामाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे ‘वारकरी संमेलनाचे’ घेण्यात आले.
राज्यभरातून वारकरी संमेलनात सहभागी झाले होते. दरम्यान, नेते शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केलेल्या सामाजिक, अध्यात्मिक, क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून त्यांचा ‘विशेष सामाजिक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
हेही वाचा – सावधान! पुण्यासह या जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार
यावेळी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल महाराज मोरे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, हभप शामसुंदर सोन्नर महाराज, हभप डॉ. बालाजी जाधव, हभप ज्योती जाधव महाराज, मुबारक शेख महाराज आदी उपस्थित होते.
सतीश काळे हे गेल्या पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेड या पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी आंदोलन करत शेतक-यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने तसेच उपोषणे केली.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सतीश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. आंदोलन करुन संभाजी बीडीचे नाव बदलून घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याप्रकरणी त्यांनी आंदोलन केले. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वर्षी ‘रक्तदान शिबीर’ तसेच आरोग्य शिबीरे देखील त्यांनी घेतली आहेत.





