आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनानं दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू

सातारा | साताऱ्यामधून एक मोठी अपघाताची बातमी समोर आलीआहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या आहेत.
ही घटना दहिवडी जवळील बिदाल शेरेवाडी भागात घडली आहे. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं दुचाकीला उडवलं. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
हेही वाचा – धक्कादायक! निगडी येथील शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
माझा दौरा सुरू होता. माझी गाडी गावात पोहचली होती. एक गाडी मागे होती.. ती गाडी माझ्या ताफ्यासोबत नव्हती. पण मी निघून गेल्यावर हा अपघात झाला. त्या गाडीत माझी लोकं होती. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कारवाई करतील जी असेल ती, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली आहे.





