Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किवळेमध्ये चार दुकानांना आग; 70 लाखांचे नुकसान

पिंपरी : किवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत असलेली चार दुकाने आगीत भस्मसात झाली. ही घटना मंगळवारी  मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत असलेल्या दुकानांना आग लागल्याची माहिती रितेश खांडेलवाल यांनी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशामक मुख्यालयातून तीन, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रातून एक, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राचा एक आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या दुकानांचे शटर कुलूपबंद होते. त्यामुळे  पावर कटर मशीनने शटर कट करण्यात आले. आगीवर होज व होज रील होजच्या साह्याने पाणी मारून आग पूर्णपणे विझविण्यात आली.

हेही वाचा     –        संविधान भवनाच्या उभारणीसाठी वास्तू विशारद संस्थेला मंजुरी

या आगीत पीजीडी कम्प्युटर्स, श्री दुर्गा प्रोव्हिजन, ओम गणेश इंटरप्रायझेस आणि श्री लक्ष्मी केरला स्टोअर आणि हॉटेल ही दुकाने भस्मसात झाली. या आगीत 70 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज चारही दुकान मालकांनी व्यक्त केला आहे.

अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संपत गौंड, सारंग मंगरूळकर, संजय महाडिक, रुपेश जाधव, लक्ष्मण बंडगर, अनिल माने, श्रीहरी धुमाळ, साबळे, ट्रेनि फायरमन शिवाजी पवार, गौरव सुरवसे, सिद्धेश दरवेश, किरण राठोड, राज शेडगे, प्रतीक आहीरेकर, राहुल कराडे, अनिल गोसावी, परमेश्वर दराडे, श्रीवर्धन, पाटील, शिंदे, पवार, मोरे, कवडे, चिंता, निकम, लावड, चव्हाण, पाटील, तडवी यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button