breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune | पोर्श कार अपघातप्रकरणी आणखी २ जणांना अटक

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाच्या पोर्शने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मुलाला वाचविण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्यानंतर त्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबियांसह ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांना अटक केली होती. आता या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांच्या माध्यमातून अगरवाल ससूनमधील डाॅ. अजय तावरेच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले. आदित्य अविनाश सूद (वय ५२), आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा     –      राज्यात पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार! ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा 

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदल प्रकरणात यापूर्वी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी (२० ऑगस्ट) निर्णय देणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button