breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

Social Media: ‘कॉर्पोरेट’ आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हॉट्ॲप चॅनेल’ला वाढता प्रतिसाद!

‘सोशल मीडिया’वर प्रचंड क्रेझ असलेला पश्चिम महाराष्ट्रातील ‘दबंग आमदार’

पुणे । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांची ‘सोशल मीडिया’वर मोठी क्रेझ आहे. पैलवान ते कॉर्पोरेट आमदार असा त्यांच्या राजकीय वाटचालीचा प्रवास आहे.

प्रखर हिंदूत्त्ववादी, बैलगाडा शर्यत प्रेमी यांच्यासह गोवंश आणि गोसंवर्धनासाठी काम करणाऱ्या राज्यातील खेड्यापाड्यांतील नागरिकांमध्ये आमदार लांडगे यांच्याप्रति विशेष आत्मियता आहे. भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावशाली नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.

अत्यंत कार्पोरेट जनसंपर्क कार्यालय, परिवर्तन हेल्पलाईन, जॉब डेस्क, वैद्यकीय सहाय्यता कक्ष, यासह शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय योजना कक्ष असे सुसज्ज कार्यालय आणि कामाचा ‘स्ट्राईक रेट’ आघाडीवर असलेले आमदार महेश लांडगे यांनी आता ‘व्हॉट्सॲप चॅनेल’ही सुरू केले आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंकडेल अशा माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या सातत्याने संपर्कात असणारा हा लोकप्रतिनिधी आता बदलत्या काळानुरुप ‘व्हॉट्सॲप चॅनेल’वरही उपलब्ध होणार आहे.

या चॅनेलच्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी केलेली विकासकामे, घेतलेले निर्णय आणि सोशल मीडियातून नागरिकांसमोर घेवून घेत आहेत. अल्पावधीतच सुमारे ५ हजार फॉलोअर्सचा टप्पा त्यांनी पूर्ण केला. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील राजकीय नेत्यांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.

नागरिकांना केले आवाहन…

आमदार महेश लांडगे यांचे रोजचे Whatsapp अपडेट 📢 मिळवण्यासाठी QR Code Scan करून / खालील लिंक वर क्लिक करून Whatsapp Channel ला FOLLOW करा असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Va51BffDOQIXqDymUC1J

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button