मराठी मुस्लिम सेवा संघाचा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने काढलेल्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होवून मराठी मुस्लिम सेवा संघाने पाठिंबा दिला.मराठा समाज आरक्षणाची जी मागणी करीत आहे,ती योग्य असून सरकारने चालढकल करू नये,असे आवाहन मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर महंमद ठाकूर यांनी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.
हेही वाचा – भोसरीतील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी ‘स्पेशल गिफ्ट’
दरम्यान,रविवार दि ११ ऑगस्ट रोजी पुण्यात काढण्यात आलेल्या शांतता रॅलीत मराठी मुस्लिम सेवा संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी मनोज जरांगे -पाटील यांचे स्वागत केले.या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्यांचे आणि नाश्त्याचे वाटप केले.यामध्ये संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान,पुणे शहर अध्यक्ष जावेद(भाई) शेख यांच्यासह पृथ्वीराज सुतार शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, सिकंदर मुलानी, असरार पठाण,रईस शेख,सरफराज कुरेशी,अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.