पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-36-780x470.jpg)
पिंपरी : पूर परिस्थितीमुळे ज्या ज्या ठिकाणावरून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्या सर्व घरांमध्ये वैद्यकीय विभागामार्फत एम.पी.डब्ल्यु, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत घरोघरी जाऊन जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत सर्वेक्षण, जनजागृती व आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नद्यांना पुर आल्याने नदीकाठच्या व पुरबाधित नागरिकांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सदर नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी वैद्यकिय विभागाने रुग्णालय झोन निहाय 16 पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन लक्षणानुसार औषधोपचार करण्यात येत आहेत.
हेही वाचा – शेख हसीना भारतात आहेत का? राहुल गांधींच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री म्हणाले..
पूर परिस्थितीमुळे ज्या ज्या ठिकाणावरू) नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्या सर्व घरांमध्ये वैद्यकीय विभागामार्फत एम.पी.डब्ल्यु, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत घरोघरी जाऊन जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत सर्वेक्षण, जनजागृती व आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे असे वैद्यकिय विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराचे 46, चिकुनगुण्याचे 5 व झिका आजाराचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत. झिका आजाराचे दोन्ही रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. तसेच “ डेंग्यु मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” अंतर्गत प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत नागरीकांनी आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे पाणी साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, कोणत्याही प्रकारचा ताप व इतर लक्षणे असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.