breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

इराण-इस्रायल यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धच्या छायेत!

iran and iraq war :  सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशांत तणावाची स्थिती आहे. याच तणामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. हमासचा नेते इस्माईल हनियाह यांच्या हत्येमुळे तेहरान हा देश चांगलाच आक्रमक झाला असून या देशाने हनियाह यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगितले आहे.  हनियाह यांच्या हत्येमागे इस्रायल या देशाचा हात असल्याचा दावा तेहरानने केला आहे.

लष्करी कमांडर फुआद शुकर यांच्या मृत्यूमुळे तेल अविवने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यामुळे दुसरीकडे तेल अविवचे लेबनॉनशी वाद चालू आहेत. इस्रायलव्याप्त गोलान हाईट्स या प्रदेशातील फुटबॉलच्या मैदानावर अचाकन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेदेखील आखाती प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगापुढे तिसऱ्या महायुद्धाची भीती उभी ठाकली आहे.

हेही वाचा – पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

इराण आणि इस्रायल यांच्यातील याच तणावाच्या स्थितीवर तसेच मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या प्रादेशिक संघर्षामुळे तिसरे महायुद्ध छेडले जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत इंडियन नॉस्ट्राडॅमस अशी ओळख असलेल्या कुशल कुमार यांनी याबाबत भाष्य केले आहे. कुशल कुमार यांनीच महायुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या 4 किंवा 5 ऑगस्टला युद्धाची सुरुवात होऊ शकते, असे भाकित त्यांनी केले आहे.

कुशल कुमार यांनी सांगितल्यानुसार सध्या दोन रशियन आणि दोन चिनी लढाऊ विमान (बॉम्बर्स) अलास्काच्या जवळपास हवेत फिरत आहेत. दुसरीकडे क्यूबाकडून लष्करी सराव चालू आहे. तसेच रोमानियातील स्थितीमुळे संपूर्ण आशिया तसेच युरोपीय प्रदेशात युद्धाला सुरुवात होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button