‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं..’; राष्ट्रवादीने महायुतीला डिवचलं
मुंबई | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने जोरदार मुसंडी मारत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला. त्यानंतर कोल्हापूरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत शरद पवारांची स्तुती करताना विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
हेही वाचा – अजित पवार गटाचं टेन्शन वाढणारी बातमी, सुप्रिया सुळे यांचा ‘त्या’ वृत्ताला दुजोरा
https://x.com/UddhavKumthekar/status/1799293474199785741
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवताना तब्बल ३० जागा जिंकल्या आहेत. सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.