कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णांना अटक
प्रज्वल रेवण्णा सहा दिवसांची पोलीस कोठडी
कर्नाटक : कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी जर्मनीहून परतलेल्या प्रज्वल रेवण्णा यांना आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. तसेच त्यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने आता त्यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी भारतातू पळ काढला होता. तसेच ते जर्मनीत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपण ३१ मे रोजी भारतात आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा आज सकाळी भारतात दाखल झाले.
दरम्यान, रेवण्णा भारतात दाखल होताच कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. तसेच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.