राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय? शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. त्यामळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला, असं ते म्हणाले. यावरून शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते मला माहिती नाही. राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही. मी असं ऐकलं होतं की त्यांचा नाशिक मध्ये स्ट्राँग बेस आहे (नाशिकमध्ये त्यांचा पक्ष मजबूत स्थितीत आहे). मात्र मला हल्ली नाशिकमध्ये ना ते दिसतात ना त्यांचा पक्ष.
हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मी छोट्या पक्षांबद्दल बोललो होतो. मी काही शिवसेनेबद्दल बोललो नाही. शिवसेना हा खूप मोठा पक्ष आहे. शिवसेना आज विधानसभेत भाजपानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे ५६ आमदार निवडून आले होते. तसेच आमचे ५४ आमदार होते. काँग्रेसचे ४० ते ४५ आमदार होते. शिवसेना ही विधानसभेमधील एक मोठी शक्ती आहे. त्यामुळे मी त्यांच्या पक्षाबद्दल बोललोच नाही, असंही शरद पवार म्हणाले.





