अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडीत बजाविला मतदानाचा हक्क!

पिंपरी | मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या मतदान केंद्रावर जात मतदान केले. सर्वांनी घरातून बाहेर पडावे आणि मतदान करावे. मी केले सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन सोनाली कुलकर्नीने मतदारांना केलं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, की मतदानादिवशी मतदार इकडे तिकडे फिरायला जातात असे मला वाटत नाही. लोक मतदान करत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. त्यामुळे कोणाला मत द्यावे, का द्यावे, त्यातून का होणार आहे पुढे असे बरेच प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहेत. या प्रश्नांना उत्तर द्यायचे असेल, किंबहुना हे का घडतेय, त्याच्या बद्दल प्रश्न विचारायचे असतील, तक्रारी करायच्या असतील तर मतदानाचा हक्क बजवावा.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 | पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १६.१६, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १४.८७ तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १४.५१ टक्के मतदान झाले आहे अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत असून मतदार यादीत नाव वगळल्याच्या तक्रारी ही मतदारांकडून येत आहेत पहिल्या दोन तासात मतदान शांततेत पार पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.





