Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

LokSabha Election 2024 | मावळमध्ये ११ वाजेपर्यंत १४.८७ टक्के मतदान

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. पहिल्या चार तासात १४.८७ टक्के मतदान झाले. उरणमध्ये १७.६७ टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये १४.७९ टक्के कर्जत १४.२७ टक्के, चिंचवड १४.९३ टक्के, पिंपरी १३.०९ टक्के आणि मावळ विधानसभा मतदारसंघात १४.७५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणात आहेत.

हेही वाचा    –      EVM वर चुकीचे बटन दाबले गेले तर ‘या’ गोष्टी करा! जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे 

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button