शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार? पुणे, सातारा किंवा माढ्यातून लढवणार?

पुणे | देशात लोकसभा निवडणुक जाहीर झाली असून त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शरद पवार यांनी पुणे, सातारा किंवा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
शरद पवार पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले की, मी आजवर १४ निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुका जिंकल्या देखील आहेत. त्यानंतर मी चार वर्षांपूर्वीच जाहीर केले की, यापुढे निवडणुका लढवायच्या नाहीत. मात्र असे असताना देखील आपण याही वेळी माढा, सातारा किंवा पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा – खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ५ वर्धापनदिन उत्साहात साजरा
दरम्यान, पुण्यातून भाजप नेते मुरलीधर मोहोळ निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. तर माढ्यातून भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर आणि साताऱ्यातून भाजप नेते उदयनराजे भोसले निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





