राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज दिल्लीत भेट झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न दोन्ही बाजून केले जात आहेत. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे आणि अमित शाह भेटीविषयी अमित ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा आहे.
अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटी दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!,’ असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – नॅशनल पेन्शन योजनेच्या नियमात मोठा बदल, १ एप्रिलपासून लागू होणार
दरम्यान, राज ठाकरे-अमित शाह यांच्या भेटीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.