लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा निर्णय, पेट्रोल आणि डिजेलच्या दरात कपात

Petrol-Diesel price | लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असताना सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरांत कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली.
केंद्र सरकारनं पूर्ण देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलचा दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर हा नवीन दर लागू झाला आहे. मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ प्रति लीटर तर डिझेलचा भाव ९२.१० प्रति लीटर झाला आहे.
हेही वाचा – निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉण्ड्सचा डेटा अपलोड, वाचा सविस्तर
कोणत्या शहरात पेट्रोलचे किती दर?
शहर जुने दर नवीन दर
मुंबई १०६.३१ १०४.२
कोलकाता १०६.३ १०३.९४
चेन्नई १०२.६३ १००.७५
नवी दिल्ली ९६.७२ ९४.७२
कोणत्या शहरात डिझेलचे किती दर?
शहर जुने दर नवीन दर
मुंबई ९४.२७ ९२.१५
कोलकाता ९२.२४ ९०.७६
चेन्नई ९४.२४ ९२.३४
नवी दिल्ली ८९.६२ ८३.६२





