बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, ‘या’ दोन खेळाडूंना मोठा धक्का!
BCCI Annual Contract List | बीसीसीआयने २०२३-२४ साठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. A+, A, B आणि C अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. या चार कॅटेगरीमध्ये ३० खेळाडूंना निवडले आहे. विकेटकीपर फलंदाज ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला आहे.
बीसीसीआयच्या ए प्लस या कॅटेगरीमध्ये आधी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या तिघांचा समावेश होता. यामध्ये आता रवींद्र जडेजा याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंचाही पहिल्यांदा वार्षिक करारात समावेश केला आहे.
बीसीसीआय वार्षिक करार यादी
A+ : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
हेही वाचा – ‘रेड झोन’ बाधितांवरील टांगती तलवार कायमची दूर व्हावी; संजोग वाघेरे पाटील
A : रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
B : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.
C : रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वेगवेगळी वार्षिक रक्कम दिली जाते. A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक फी मिळते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी तर B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी मिळतात. तर C श्रेणीतील खेळाडूला १ कोटी दिले जातात.