पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या ‘‘स्वराज्य ज्योत’’ चे उत्साहात स्वागत
'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष : शहरातील शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-13-2-780x470.jpg)
पिंपरी : मराठी भाषा समृद्ध करणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि शूरता, वीरता, पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे स्मृतिस्थळ भक्ती-शक्ती शिल्पसमूह इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘स्वराज्य रथ’ आणि ‘स्वराज्य ज्योत’ पोहोचली.
पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी ‘स्वराज रथा’चं ढोल ताशा गजरात जल्लोषात स्वागत करत फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेत ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेने संपूर्ण भक्ती-शक्ती चौक परिसर दुमदुमून गेला.
पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा येथे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शाम लांडे यांनी ‘स्वराज रथा’चं उत्साहात स्वागत केलं.
हेही वाचा –उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सरचिटणीस बाप्पा सावंत, सेवादल सेलचे राज्यप्रमूख राजेंद्र लावांघरे, पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, पिंपरी चिंचवड खजिनदार दीपक साकोरे, युवक शहर अध्यक्ष शेखर काटे तसेच शिवप्रेमींसह पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.