‘पंतप्रधान मोदी ओबीसी असल्याचा दावा खोटा’; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणात स्वत:ला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे. या जातीला ओबीसी भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती. ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळे पंतप्रधान मोदी हे खूप आधीपासून जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आले आहेत. कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा – ‘पुणे की पसंत मोरे वसंत!’; वसंत मोरेंचं आजचं स्टेटस चर्चेत
सच सुनो!
नरेंद्र मोदी जन्म से OBC नहीं हैं, उन्हें OBC गुजरात की भाजपा सरकार ने बनाया है।
वह कभी पिछड़ों के हक़ और हिस्सेदारी के साथ न्याय नहीं कर सकते।
नरेंद्र मोदी जातिगत गिनती नहीं करने वाले।
जातिगत गिनती कांग्रेस ही कर के दिखाएगी। pic.twitter.com/GqT00YFbao
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसने ओबीसी समाजाला कधीही न्याय दिला नाही. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला. पण कर्पुरी ठाकूर यांच्याबरोबर काँग्रेसने अतिशय निंदजनक असा व्यवहार केला होता. १९७० साली कर्पुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री झाले असताना त्यांना हटविण्यासाठी काँग्रेसचे राजकारण केलं होतं. काँग्रेसला वंचित-मागासवर्गी लोक पुढे आलेले चालत नाहीत.
काँग्रेसचे माझे सहकारी हल्ली सरकारमध्ये किती ओबीसी आहेत, याची मोजदाद करत असतात. त्यांना ओबीसींची संख्या कमी असल्याची चिंता सतावते. पण मी हैराण आहे की, त्यांना माझ्याएवढा मोठा ओबीसी कसा काय दिसत नाही? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.





