Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

रेल्वे विभागाचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तयार करतेय ‘सुपर अ‍ॅप’

Indian Railway Super App : इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांना एक खुशखबर देणार आहे. इंडियन रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे.

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप्स घ्यावे लागतात. नवीन सुपर अ‍ॅप लाँच झाल्यानंतर यूजर्सना केवळ एकच अ‍ॅप पुरेसं असणार आहे.

हेही वाचा   –    ‘काँग्रेसचा आत्मा हा हिंदूच, काँग्रेसनेही अयोध्येत दाखल व्हायला हवं’; ठाकरे गटाचा सल्ला 

अ‍ॅपमध्ये काय असणार?

नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदद, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूजर्सना वेगवेगळे अ‍ॅप्स घ्यावे लागणार नाहीत. तसेच रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे यासह अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group