breaking-newsपुणेमहाराष्ट्र
दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे बेतले दोघांच्या जीवावर
![Young woman killed in dumping of illegal sand transport dumper](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/accident.jpg)
दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले असताना नियंत्रण सुटून समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सहकारनगर येथे गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास झाला…….
उदय पाटील (25, रा. धुळे ) व रोहित दिनेश पाटिल (24, मुळ रा. नंदूरबार) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर राहुल लोटन कणखर (26, नंदुरबार) हा जखमी झाला आहे. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील सन्नी रणजितकुमार शर्मा (34, रा. आंबेगाव) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वरील तिघेजण एकाच दुचाकीवर बसून ट्रिपलसीट कात्रजहून स्वारगेट्च्या दिशेने निघाले होते. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीने समोरून निघालेल्या सान्नि शर्मा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.