breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
Weather Update : राज्यात हळूहळू गुलाबी थंडीला सुरूवात, हवामान खात्याचा इशारा
पुणे : राज्यातील तापमानात हळूहळू घट होत असल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.
हेही वाचा – दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ
किमान तापमानाबरोबर राज्यातील कमाल तापमानात सुद्धा सरासरीपेक्षा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर देशात मध्य भारत आणि अति उत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी नोंदले जाऊ शकते.