Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं निधन

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचं आज पहाटे सहा वाजता निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं.

हेही वाचा – ‘आयोध्येतील बाबरी मशिदीची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी करावी’; मुस्लिम लीगची मागणी

मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button