TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘कृषिप्रधान’ भारतात बैल शेतकऱ्यांचा हक्काचा सवंगडी!

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या भावना; लांडगे कुटुंबियांकडून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा

पिंपरी : शेतकऱ्यांचा हक्काचा सवंगडी बैल आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याबरोबर बैलाप्रति कृतज्ञता भाव असला पाहिजे. शेती-माती आणि संस्कृती जपण्यासाठी आणि बळीराजाच्या सन्मानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

आमदार लांडगे यांनी कडूस येथील निवासस्थानी बैलपोळा निमित्त स्वत: बैलांचा साजश्रृंगार करण्यासाठी पुढाकार घेतला. सकाळी बैलांना आंघोळ घालण्यात आली. बैलांच्या पाठीवर छान नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा असा साज श्रृंगार करण्यात आला. सायंकाळी पूजा करुन बैलाला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, जगभरात आजही आपला भारत देश ‘कृषीप्रधान’ म्हणून ओळखला जातो. शेतकरी, बळीराजा या देशाचे अन्नदाता आहेत. शेतकऱ्यांसोबत शेतात राबणारा हक्काचा ‘सवंगडी’ म्हणजे बैल. भारतीय संस्कृतीमध्ये बैलाला आदर आणि श्रद्धेचे स्थान आहे. बैलपोळा निमित्त आज आमच्या गोठ्यातील बैलांना पारंपरिक पद्धती साजश्रृंगार केला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आपण सर्व भूमिपुत्रांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलेला लढा… हा आपल्या शेतीसाठी..मातीसाठी…आणि संस्कृतीसाठी होता. त्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button