‘७२ तासांत शिंदे-फडणवीस सरकार पडणार’; संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबई : सर्वेच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून होणाऱ्या दिरंगाईबाबत याचिकांवर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलच खडसावलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, पुढील ७२ तासांत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार जाणार आहे. मी ७२ तास आधीही बोललो होतो आत ती वेळ आली आहे. विधानभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार, असं आजचे न्यायालयाचे मत आहे.
हेही वाचा – दुपारच्या जेवणासाठी उशीर होत असेल तर ‘हे’ तीन उपाय नक्की करून पाहा..
सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ. कारण आमचे आदेश पाळले जात नाहीयेत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या आधी निर्णय घ्यायला हवा, असं देखील संजय राऊत यांनी खडसावून सांगितलं आहे.