Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहत्या पाण्यात गणेश मुर्तींचे विसर्जन, हिंदू जनजागृती समितीचा पुढाकार

पिंपरी – चिंचवड येथे बिर्ला घाट, वाल्हेकर वाडी, औंध घाट येथे हिंदु जनजागृती समितीने भाविकांनी धर्मशास्त्रासुनार श्रीगणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, यांसाठी मोहीम राबवली. भाविकांनी त्याला प्रतिसाद देऊन हिंदू धर्मशास्त्रानुसार विधीपूर्वक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यावर भर दिला.

 

या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते नदीच्या घाटावर हातात प्रबोधन करणारे फलक घेऊन थांबले होते. विसर्जनासाठी येणार्‍या भाविकांना विसर्जनामागील अध्यात्मशास्त्र समजून सांगत होते. त्यांना विसर्जन करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करत होते. हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या या मोहिमेमुळे दीड दिवस, तसेच पाचव्या दिवशी जवळपास सर्व विसर्जन घाटांवर गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन केले. कृत्रिम हौदामध्ये विसर्जन, मूर्तीदान यांसारख्या उपक्रमांकडे भाविकांनी पाठ फिरवल्यामुळे समाजाचा कल धर्माचरणाकडेच असल्याचे दिसून आले.

 

याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे, गणेशमूर्तींचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच व्हायला हवे, वाहत्या पाण्यात श्रीगणेशमूतीचे विसर्जन केल्याने आनंद मिळतो. अशा सामूहिक प्रतिक्रिया भाविकांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केल्या. चिंचवड येथे बिर्ला घाट येथे भाविकांना घाटावरून जाण्या- येण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग असतांना जाण्याच्या मार्गावर लोखंडी दुभाजक घालून दोन रस्ते केले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button