Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यभरात दहीहंडी उत्साहात; १०७ गोविंदा जखमी, १४ जण गंभीर

मुंबई : राज्यभरात काल दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागला आहे. राज्यात तब्बल १२४ गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईत १०७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यामध्ये १४ जण गंभीर जखमी आहेत. तर, ठाण्यात १७ गोविंदा जखमी झाले.

मुंबईत दहीहंडी फोडताना थरावरून खाली पडून १०७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक ३१ जखमींना उपचारार्थ आणले असून, त्यातील सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्याखालोखाल पोद्दार रुग्णालय १६ जखमींना उपचारार्थ आणले होते. त्यातील सहा जणांना रुग्णालयात दाखल केले आहेत. राजावाडी रुग्णालयात १० जण उपचारार्थ आले असून, त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा – राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळला, कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी ९ थर रचण्यात आले आहे. रात्री १० वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला १० थर लावता आले नाही. ठाण्यात ‘जय जवान’ गोविंदा पथकाने प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group