Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, आणि..’; हिंदू महासभेच्या चक्रपाणी महाराजांची मागणी

मुंबई : चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ISRO च्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशी मागणी केली आहे.

हिंदू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावं अशी मागणी केली आहे. भारताच्या संसदेने चंद्र ग्रहाला हिंदू राष्ट्र घोषित केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. चांद्रयान-३ ज्या ठिकाणी लँड झालं त्या जागेला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे. ती जागा म्हणजे चंद्राची राजधानी व्हावी आणि कुठल्याही जिहादी विचारसरणीच्या माणसाला तिथे जाऊ देता कामा नये या आशयाचं ट्वीट चक्रपाणी महाराज यांनी केलं आहे.

हेही वाचा – आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला नोटीस पाठवणार; नेमकं कारण काय?

दरम्यान, २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यावेळी चक्रपाणी महाराजांनी गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. करोनापासून वाचण्यासाठी गोमूत्र प्या असा अजब सल्ला दिला होता. प्राणी मारून खाणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढतो आहे, करोना व्हायरस त्यांच्यामुळेच आला आहे, असंही दावा त्यांनी त्यावेळी केला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button