Pune : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आज लोकार्पण!
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते आज (१२ ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत.
नितीन गडकरी हे या कार्यक्रमानंतर एक महत्वपूर्ण बैठकही घेणार आहेत. ही बैठक पाषाण येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी कराव्या लागणाऱ्या संभाव्य उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Get ready to unveil the stunning Chandani Chowk Interchange Project in Pune! Prepare to be amazed as this architectural marvel graces the cityscape.#PragatiKaHighway #GatiShakti #ChandaniChowkFlyoverPune pic.twitter.com/JtBa81UgQp
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 11, 2023
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची दांडी?
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांनी समारंभाला न येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.