‘राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अपूर्वा अलाटकर हीचा सन्मान’; वर्षा जगताप

पिंपरी : अपूर्वा अलाटकर ही मेट्रो चालवणारी पहिली महिला ठरली आहे, मेट्रो ही देशासह राज्याच्या विविध भागांत विस्तारत आहे. अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची सुरुवात 2 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आली, ह्यावेळी आपल्यातील कौशल्य दाखवण्याची संधी सातारा जिल्ह्यातील अपूर्वा प्रमोद अलाटकर ह्या युवतीला मिळाली.
मेट्रो ची मास्क ऑन की च्या साथीने लोको पायलट अपूर्वा हिने सर्व तंत्रिक बाबीच्या मदतीने वणाज येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली.
खरंतर अपूर्वा हि पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला ठरली आहे. मॅकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर रीतसर परीक्षेच्या ३ फेऱ्या पूर्ण करत प्रशिक्षण घेतल्यानंतर तीने मेट्रो चालविण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दानवे-बुमरेंमध्ये जोरदार बाचाबाची!
आपल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील युवतीने आज अनेकांना पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्याचे नव्याने स्वप्न दाखविले म्हणून त्याचा सार्थ अभिमान बाळगत राष्ट्रवादी युवती संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने व वर्षा जगताप यांच्या पुढाकाराने समाजाप्रती काही देणं लागतो, ही जाणीव ठेवून अपूर्वाचा सन्मान आणि सत्कार डेक्कन या स्टेशन वर जाऊन केला.
ह्यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, शुभदा पवार, मेहेक इनामदार, मयुरी सोळसे, मेघना जगताप, स्नेहल मंचेकर, चैत्राली आढाव, वैष्णवी जगताप या युवती उपस्थित होत्या.





