Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या ८८ वर्षी निधन

मुंबई : मराठी नाट्यसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागच्या १५ दिवसांपासून ठाण्यातल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काल संध्याकाळपासून त्यांची तब्यत खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. त्याचं मूळ गाव गुहागर हे होतं. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता. त्याच्याकडे जयंत सावरकर आले आणि गिरगावातच त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ होतं. आपल्या कारकिर्दीची सुरूवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्यांनी हैशी नाट्य संस्थांमधून त्यांनी काम करण्यास सुरूवात केली.
हेही वाचा – ‘..तर अजित पवार मुख्यमंत्री होतील’; मंत्रीमंडळातील मंत्र्याचं विधान
जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांस भावपूर्ण श्रद्धांजली! #JayantSawarkar #Zeemarathi pic.twitter.com/6elUM6Rcat
— Zee Marathi (@zeemarathi) July 24, 2023
जयंत सावरकर यांनी १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे. जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा अधिक हिंदी सिनेमांमध्येही काम केली आहेत. तसेच अपराध मीच केला, अपूर्णांक, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, लग्नाची बेडी, व्यक्ती आणि वल्ली, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले या गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे.





