Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

Shiv Thackeray : मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे जखमी, हाताला गंभीर दुखापत

Shiv Thackeray : ‘खतरों के खिलाडी १३’ या बहुचर्चित कार्यक्रमाचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. यामध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा देखील सहभागी झाला आहे. दरम्यान, शुटिंगदरम्यान शिव ठाकरेंच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

‘खतरों के खिलाडी १३’ या शोच्या शुटिंगदरम्यान शिव ठाकरेचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. बोटांना टाके घालावे लागले आहेत. शिव ठाकरेने एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का पसला आहे.

हेही वाचा – Pune : लोणावळ्यातील लोहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी, चार तास अडकून पडले

https://twitter.com/priyankadagar03/status/1675714691287638016

शिव ठाकरे याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आरशाच्या समोर जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर शिव ठाकरे हा मोबाईलचा कॅमेरा आपल्या हाताकडे फिरवतो आणि त्याची जखम दाखवतो. यामध्ये शिव ठाकरे याच्या हाताला मोठी दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही टाके टाकल्याचे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button