Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Bakri Eid : ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला

मुंबई : राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार २९ जून रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी बुधवार २८ जून रोजी दर्शविण्यात आलेली होती. तथापि, बकरी ईद (ईद-उल-झुआ) हा सण गुरुवार २९ जून रोजी येत असल्याने बुधवार २८ जून रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता बकरी ईद (ईद-उल- झुआ) ची सार्वजनिक सुट्टी गुरूवारी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

हेही वाचा – पुण्यातील घटनेनंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले..

२९ जून या दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळं दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्यानं त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनानं यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनानं यात बदल केल्यानं या दोन्ही सुट्ट्याच एकाच दिवशी आल्यानं एकच सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button