येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी, ४ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील वर्चस्वातून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली असल्याचं समजतं आहे.
या प्रकरणी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे, तेजस बाळासाहेब बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारागृह रक्षक कृष्णा वानोळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – Pune : पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी
येरवडा कारागृहातील सीजे विभागात पाण्याच्या हौदाजवळ कैदी प्रकाश रेणुसे, विकास कांबळे, वैभव थिटे,तेजस बच्छाव यांचा सुजीत टाक याच्याशी वाद झाला. या प्रकाश रेणुसे, विकास कांबळे, वैभव थिटे,तेजस बच्छाव यांनी सुजीत याला शिवीगाळ करुन त्याला प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. मारहाणीत तो जखमी झाला आहे. याबाबतचा अधिक तपाल पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे करत आहेत.