Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

व्हॉट्सॲप आणणार ‘हे’ भन्नाट फिचर, युजर्स होणार समाधानी!

Whatsapp update : व्हॉट्सॲपने वापरकरत्यांसाठी नवीन फिचर्स आणले आहे. व्हॉट्सॲपने आता ios आणि android च्या लेटेस्ट व्हर्जनवर व्हिडीओ मेसेज फीचर्सची टेस्टींग सुरू केली आहे. व्हॉइस मेसेजप्रमाणे वापरकर्त्यांना हे फिचर व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि पाठवणे हा शॉर्टकट देणार आहे. याच्या मदतीने तुमची चॅट करत असताना एका क्लीकवर व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवता येणार आहे.

WABetaInfo या फीचर ट्रॅकरने शेअर केलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप बीटा व्हर्जन 23.12.0.71 आणि अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन 2.23.13.4 हे नवीन व्हिडीओ मेसेज फिचर दिसले. जे स्क्रीनच्या खालील बाजूस असलेल्या चॅट बारवर अटॅचमेंट बटणाच्या बाजूला आहे.

हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडोमध्ये मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करू शकता. हे तुम्हाला एक व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करू देईल. ज्याची रेकॉर्डिंग मर्यादा ही ६० सेकंड इतकी असू अशक्ते. WABetaInfo वेबसाइटचे असे म्हणणे आहे की जर का वापरकर्त्याला व्हिडीओ मेसेज आला तर ते मोठे दिसण्यासाठी त्यावर वापरकर्ते सिंगल क्लिक करू शकतात. ऑडिओ बाय डिफॉल्ट म्यूट केला जातो तो अनम्यूट केला जाऊ शकता.

व्हॉट्सॲपवर टेक्स्ट मेसेज, अटॅचमेंटसह व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलप्रमाणे नवीन व्हिडीओ मेसेज फीचरला end-to-end encryption अंतर्गत ठेवण्यात आले आहे. हे मेसेज इतर कोणत्याही चॅटवर फॉरवर्ड केले जाऊ शकत नाही. तसेच वापरकर्ते केवळ स्वतःच्या फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेलेच व्हिडीओ मेसेज पाठवू शकतात. तथापि, व्हिडीओ मेसेज मिळणारा व्यक्ती कोणत्याही इतर चॅट ग्रुपसह व्हिडीओ मेसेज शेअर करण्यासाठी आपल्या स्क्रीनवरील कंटेंट रेकॉर्ड करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button