Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Maharashtra Monsoon : राज्यात आज पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाजही सांगण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपरंयत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आले. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ४० अंश सेल्सिअस इतका होता.
हेही वाचा – Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची तयारी पूर्ण, ‘या’ दिवशी लागणार निकाल
पुण्यात शुक्रवारी आणि रविवारी आकाश निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी अंशत: ढगाळ राहील, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे. पुण्यात बुधवारी ३९.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले.





