Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘द केरळा स्टोरी’ सिनेमा मोफत दाखवणाऱ्यांवर केदार शिंदे आक्रमक; म्हणाले,..

शाहीर साबळे कोण हे नेत्यांना ठाऊक आहे का?

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरू चांगलाचा वाद सुरू आहे. भाजपकडून या सिनेमाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी हा सिनेमा महाराष्ट्रात मोफत दाखवणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यावरून दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

केदार शिंदे यांनी आपल्या ट्वीमध्ये म्हटलं आहे की, दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत जवळपास ३ कोटी हून अधिक कमाई केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button