CBI ची मोठी कारवाई, माजी अधिकाऱ्याकडे सापडली २० कोटींची कॅश
![Big operation of CBI, cash of 20 crores found with ex-officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/cbi-raids-780x470.jpg)
दिल्ली : सीबीआयने पुन्हा एकदा एका मोठ्या अधिकाऱ्यावर छापा टाकून कोट्यवधीची रक्कम हस्तगत केली आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या WAPCOS वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सीचे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या घरातून तब्बल २० कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
राजेंद्र कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणासंदर्भात CBI ने दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे १९ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि २० कोटी रुपये जप्त केले आहेत.
सीबीआयने जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे (WAPCOS) माजी सीएमडी राजेंद्र गुप्ता यांच्या घरातून तब्बल २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
राजेंद्र गुप्ता याच्या घरात एवढी मोठी रक्कम कुठून आली? कुणाची आहे? याची माहिती सीबीआय गोळा करत आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉटर अँड पॉवर कन्सल्टसी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड WAPCOS हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. हे जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत येते.