Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पवना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर लांडगे तर उपाध्यक्षपदी जयनाथ काटे यांची बिनविरोध निवड

पुणे : पवना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी जयनाथ काटे यांनी निवड झाली आहे. सलग दुसऱ्यावेळेस फेरनिवड करत लांडगे आणि काटे यांच्यावर संचालकांनी विश्वास टाकला आहे.

पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणुक झाली. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर लांडगे आणि उपाध्यक्षपदासाठी जयनाथ काटे यांचा असे एकच अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी अध्यक्षपदी लांडगे यांची तर उपाध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button