‘चेन्नई सुपर किंग्ज’ संघावर बंदी घाला; तामिळनाडू विधानसभेत मागणी
IPL 2023 : आयपीएल २०२३ ला सुरूवात झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज या संघावर बंदी घालण्याची मागणी तामिळनाडू विधानसभेत करण्यात आली आहे.
पट्टाली मक्कल काची पक्षाचे आमदार एसपरी वेंकटेश्वर यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघावर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कारण संघात तामिळनाडूतील एकही खेळाडू नाही. वेंकटेश्वर यांनी विधानसभेत म्हटलं की, राज्यात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र सीएसकेने आपल्या २७ जणांच्या संघात एकाही खेळाडूला संधी दिली नाही.
सीएसके तामिळनाडूचं नाव वापरून मोठी कमाई करत आहे. मात्र राज्यातील एकाही खेळाडूला संघात स्थान नाही. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री याबाबत योग्य ती कारवाई करतील, अशी आशा वेंकटेश्वर यांनी व्यक्त केली आहे.