Pune : कुख्यात गुंड गजा मारणे याला जामीन मंजूर!
बहुचर्चित खंडणी प्रकरणी गजा मारणे याची जामीनावर सुटका
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याला जामीन मंजूर झाला आहे. बहुचर्चित खंडणी प्रकरणी पुणे पोलिसांनी १६९ नुसार अहवाल सादर केल्यानंतर गजा मारणे याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
कोरोना काळात गजा मारणे याची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत जंगी मिरवणूक काढली होती. त्यावरून पुणे पोलिसांनी गजा मारणे पुन्हा कारागृहात गेला होता. २० कोटीच्या खंडणी प्रकरणी गजा मारणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर साताऱ्यात गजा मारणे पोलिसांना सापडला होता.
याच प्रकरणी पुणे पोलिसांनी गजा मारणे याच्यासह त्याच्या १४ साथीदारांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर कठोर कारवाई होत असताना पुणे पोलिसांनी जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना? असा सवाल उपस्थिते केला जात आहे.