‘व्हॅलेंटाइन’ निमित्त ९९ रूपयांत पाहता येणार ‘वेड’ सिनेमा

१३ ते १६ फेब्रुवारी या दिवशी पाहता येणार ९९ रूपयामध्ये सिनेमा
मुंबई : वर्षाचा दुसरा महिना म्हणजे प्रेमाचा महिना. ७ ते १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन आठवडा म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र प्रेमाचे वातावरण आहे. अशातच संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या रितेश आणि जेनेलियानेही त्यांच्या चाहत्यांना व्हॅलेंटाइनची स्पेशल ऑफर दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ३० डिसेंबरला रिलीज झालेला ‘वेड’ हा सिनेमा आता व्हॅलेंटाइन निमीत्त फक्त ९९ रूपयांत पाहता येणार आहे. रितेश देशमुखने त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
आमच्याकडून ‘स्पेशल व्हॅलेंटाइन गिफ्ट’ असं रितेशने म्हटलं आहे. १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीला सर्व ठिकाणी वेड हा सिनामा ९९ रूपयामध्ये पाहता येणार आहे.
दरम्यान, वेड हा सिनेमा रितेशचा दिग्दर्शक म्हणुन पहिला आहे, तर जिनिलियाचा मराठीतील पहिलाच सिनेमा आहे. वेड हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने ३१ दिवसांत जगभरातुन ७०.९० कोटींचा गल्ला कमवला आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा आकडा पार करेल याची उत्सुकता रितेश आणि जिनिलियाच्या चाहत्यांना लागली आहे.





