Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“फडणवीसांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली, जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली?”; अमोल मिटकरी

महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले १४०६९ मतंनी विजयी

नागपुर : महाविकास आघाडीकडून असलेले नागपुर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? “दया कुछ तो गडबड है”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

नागपूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यांचें व दुसरीकडे नागपूरचे वैभव रेशीमबागसंघ कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना १४०६९ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांना ६३६६ मतं मिळाली आहेत. ७ हजाराहून अधिक मतांनी गाणार यांचा पराभव झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button