Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

धनंजय देसाईच्या टिकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, त्यांच्याकडे दुसरा कोणताही अजेंडा नाही

पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते

पुणे : पुण्यात निघालेल्या सकल हिंदू मोर्च्यात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जाते. त्यांच्याकडे दुसरा कोणताही अजेंडा नाही त्यामुळे पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते म्हणून वारंवार आमच्यावर टीका केली जाते, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी कात्रज चौक येथील उड्डाणपुलाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि आज पाहणी केली. कार्डिनेशन होत नसल्यामुळे कामाला उशीर होत आहे. तसेच सर्व कामे एकत्रित काढल्याने कोणताही प्लॅन बी तयार केलेला नाही. त्यामुळे सातत्याने कात्रज चौक येथे वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज चौक ते नवले ब्रीज पर्यंत काम 80 टक्के पूर्ण झालं आहे. या कात्रज चौकातील सर्वच कामे एकत्रित काढल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे. याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group