Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

त्यांना गुळ-खोबर देऊन आमंत्रण दिल नव्हतं; चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, तर तुमच्या घरात द्या; चित्रा वाघ
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद बऱ्याच दिवसापासुन सुरू आहे. या प्रकरणी आता महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष देत हे थांबवण्याची विनंती केली. याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
समाजस्वास्थाचं काम करण्यात येत तिथे राजकारण करण्याची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारत आहेत, त्यांना गुळ-खोबर देऊन आमंत्रण दिल नव्हतं. सुप्रिया सुळे सांगत आहेत, हे थांबवा. मी माझ्याकडून थांबवते. पण, ही विकृती थांबवण्यासाठी हा लढा सुरु आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
वाईट याचं वाटतं ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवलं आहे. तिला याच्यात विकृती़ दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, तर तुमच्या घरात. आमच्या घरात देण्याची गरज नाही आहे, असेही चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना म्हटलं.
चित्रा वाघ यांचा अभ्यास कमी आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. याबद्दल विचारलं असता चित्रा वाघ यांनी सांगितलं की, तुमचा अभ्यास किती आणि काय आहे, तो पेपर सुप्रिया सुळे यांच्या दरबारात सोडवावा. आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचा अभ्यास किती आहे किंवा किती नाही, हे पाहून त्याठिकाणी बसवलं नाही आहे. आमचा अभ्यास एकदम पक्का आहे, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं.
सोबतच, देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीकडून आम्ही पुढाकार घेऊ. महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करत नाहीयेत. जशी त्यांच्या घरात एक मुलगी आहे, तशीच त्यांच्याही घरात एक मुलगी आहे. अनेक महिलांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे आपले काम नाही. महिला आयोग त्यांच्या नियमांप्रमाणे काम करेल. त्याविषयी चर्चा कशाला करायची, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button