“मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत”; उर्फीची पोस्ट व्हायरल

राजकारण्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक
मुंबई : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी मला कुठे दिसली, तर तिला मी थोबडवून काढेन, असं विधान केलं होतं. यानंतर उर्फीने मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, अशी स्टोरी उर्फीने शेअर करत भीती व्यक्त केली आहे.
राजकारण्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे, असं उर्फीने आपल्या सोशल मीडियाद्वारे म्हटलं आहे.
सोबतच, भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे आणि हो…कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही? , असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.






