Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

ऋषभ पंतला इन्फेक्शन होण्याचा धोका; 48 तासानंतर आयसीयूबाहेर

ऋषभ पंतने वेगमर्यादेचे उल्लंघन केलेलं नाही पोलिसांनी दिली माहिती
दिल्ली : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ३० डिसेंबरला त्याचा एका भीषण कार अपघात झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आता डॉक्टरांनी आयसीयूमधून बाहेर काढले आहे. मात्र, यादरम्यान रुग्णालयात त्याला भेटणाऱ्यांची गर्दी झाली आहे. रुग्णालयात भेट देणाऱ्या लोकांच्या सततच्या हालचालींमुळे पंतला पूर्ण विश्रांती मिळत नाहीये याबाबत त्याच्या परिवाराने चिंता व्यक्त केली आहे.
पंतचा अपघात झाल्यानंतर 48 तासानंतर त्याला आयसीयूबाहेर काढले आहे. तूम्हाला देखील व्हायरल व्हिडिओमध्ये दिसले असेल की, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर आणि काही आमदार ऋषभ पंतला भेटण्यास आले होते. इन्फेक्शन होण्याचा धोका असल्यामुळे पूर्वकाळजी म्हणून व्हीआयपी लोकांनी अशा भेटी टाळाव्यात, असे डॉक्टरांनी आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले.
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा ऋषभ पंत कोणत्याही नशेत नव्हता. समजा तो नशेत असता तर पंत इतक्या दूरपर्यंत येऊ शकला नसता किंवा पेटत्या कारमधून तो इतक्या सहजासहजी बाहेर निघू शकला नसता.
आम्ही अपघाताच्या ठिकाणाजवळील 8 ते 10 स्पीड कॅमेरे तपासले आहेत. नॅशनल हायवेवर असलेली वेगमर्यादा पंतने ओलांडलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्या कारचा स्पीड अधिक नसल्याचे दिसले. म्हणून वेगमर्यादेचे उल्लंघन देखील त्याने केले नव्हते, असे स्पष्ट होते. आमच्या टेक्निकल टीमने अपघाताचे ठिकाणही तपासले. आम्हाला असा कोणताही पुरावा सापडलेला नाही, ज्यातून पंतने वेगात गाडी चालवल्याचे समजेल, अशी माहिती हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button